+918048031534
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
दोन वर्षे Anxiety Disorder या आजाराशी लढणार्या मुलीच्या आईचा आज संयम संपलाच.... दहावीत ९५% मार्कांनी पास झालेली आपली मुलगी बारावीच्या परीक्षेच्या पेपरच्या विचाराने देखिल घाबरते....... हा विचारच या माऊलीला पटत नव्हता काय हो डॉक्टर...ही नाटक कशावरुन करत नसेल?...नाहीतरी ती जे सांगते त्यावरच तर तुम्ही विश्वास ठेवता....ती तुम्हाला उल्लू बनवत नसेल कशावरुन?....इति माउली असे पेचप्रसंग बरेच येतात आमच्यासमोर.... बरेच वेळा आईवडील किंवा नातेवाईक BURNOUT झालेले असतात...आपण खूप प्रयत्न करून देखिल परिस्थिती बदलत नाहीत यामुळे ते असहाय्य (Helpless) झालेले असतात....त्यांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता (coping) कमी झालेली असते....आणि त्यातूनच असे विचार येतात... पण मग खरंच मानसिक आजाराचा इतक्या सहजगत्या बहाणा करता येतो का? मानसिक आजाराचा बहाणा नक्कीच करता येतो. पण आजारी व्यक्ति आणि बहाणे करणारी व्यक्ति ओळखण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात 1. प्रत्येक मानसिक आजाराचे निदान करण्यासाठी काही निकष असतात आणि हे निकष खुप संशोधनानंतर ठरलेले आहेत. त्यामधे कालानुरूप बदल ही केले जातात. हे निकष जगात सर्वत्र सारखेच असतात. 2. मानसिक आजाराच्या लक्षणांमध्ये स्थळ आणि काळ यानुसार बदल होत नाही. 3. एखादी व्यक्ती बहाणे करत असेल तर त्यातून त्याचा काय फायदा होणार आहे? याचीही शहानिशा करावी लागते. 4. मानसिक आजाराच्या काही लक्षणांबाबतित अजिबातच नाटक करता येत नाही. उदा. कित्येक दिवस झोप न येणे, कित्येक दिवस भूक न लागणे, अतिशय अस्वच्छ राहणे, सततचा राग येणे इत्यादी 5. खरे मानसिक आजार औषधे आणि समुपदेशन केल्यानंतर कमी होतात. 6. जर एखादी व्यक्ती सतत डॉक्टर बदलत असेल आणि कोणत्याही उपचारांना गुण येत नसेल तर अशी व्यक्ती खरेच आजारी आहे का? याची शहानिशा करावी लागते. 7. काही मानसिक चाचण्या करून आजाराची खात्री करून घेता येते. एखादा व्यक्ती बहाणा करूच शकतो...पण तो फारकाळ टिकवणं जरा मुश्किल असतं. - डॉ. आदित्य पाटील मनोविकारतज्ज्ञ पुणे 7397825375/ 9975573437